पाऊस आला वारा
आला
पान लागले नाचू
थेंब टपोरे
गोरे गोरे
भर भर गारा
वेचू !
गरगर गिरकी
घेते झाड
धडधड वाजे दार
कवाड
अंगणातही बघता
बघता
पाणी लागे साचू
!
अंगे झाली ओलीचिंब
झुलू लागला
दारी लिंब
ओली नक्षी पाऊसपक्षी
कुणी पाहतो
वाचू !
ओसरुनी सर गेली
रे
उन्हे ढगांतुन
आली रे
इंद्रधनुष्यामध्ये
झळकती
हिरे माणके
पाचू !
|