टप टप टप थेंब
वाजती, गाणे
गातो वारा
विसरा आता पाटी-पुस्तक,
मजेत झेला धारा
पाऊस आला रे
पाऊस आला
घराघरावर, कौलारावर,
आले झिमझिम
पाणी
गुणगुणती झाडांची
पाने हिरवी-हिरवी
गाणी
अवती-भवती भिजून
माती, सुगंध
भरला सारा
काळ्याभोर ढगांना
झाली कोसळण्याची
घाई
इवले इवले पंख
फुलवुनी गाते
ही चिऊताई
आनंदे हंबरती
गाई समोर विसरून
चारा
मला न कळता
पहा कसे हे
पाय लागले नाचू
फुलांसारखे
थेंब उतरती
किती फुले मी
वेचू
ता थै ता थै
मोर नाचती भिजला
चिंब पिसारा
|