वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव

आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो
आम्हा दर्याची भीती नाय हो, नाय हो, नाय हो

वर आभाळ भरलंय्‌ हो
जाळं जोरात धरलंय्‌ हो
कोण करील अम्हा काय हो, काय हो, काय हो ?
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो

लाट जोशात येऊ द्या
झोका खुशाल घेऊ द्या
मागे घेणार न्हाई पाय हो, पाय हो, पाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो

देव मल्हारी पावला हो
मासा जाळ्यात गावला हो
होडी मजेमधये पुढं जाय हो, जाय हो, जाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - मीना खडीकर
स्वर - रचना खडीकर, योगेश खडीकर, शमा खळे
For the printable version of this song, click here.