ताईबाई, ताईबाई
ग,
अता होणार लगीन
तुमचं !
नखरा बिखरा
सारा विसरा
धम्मक लाडू
चारील नवरा
नवरा म्हणजे
बागुलबुवा
घेऊन जाईल त्याच्या
गावा
तिथे सिनेमा
नाटक कुठचं
?
धुणी धुवा मग
झाडून काढा
रांधा, वाढा,
उष्टी काढा
निवडा तांदूळ,
लाटा पोळ्या,
शिवा टिपा मग
सदरे, चोळ्या
करा शेवया,
भरा ग लोणचं
!
सासूबाई करतील
वटवट
दीर, नणंदा
देतील चापट
मामंजींना दमा
खोकला
जा पिकदाणी
त्यांची उचला
सुख सरलं हो
बापाघरचं !
|