मनाच्या धुंदीत
लहरीत ये ना
सखे ग साजणी
! ये ना !
जराशी सोडून
जनरीत ये ना
सखे ग साजणी
! ये ना !
चांदणं रूपाचं
आलंय भरा
मुखडा तुझा
अति साजरा
माझ्या शिवारि
ये तू जरा
चारा घालीन
तुज पाखरा
माझे डोळे शिणले
ग, तुझी वाट
पाहुनी, ग ये
गुलाबी गालांत
हासत ये ना
सखे ग साजणी
! ये ना !
जराशी लाजत
मुरकत ये ना
सखे ग साजणी
! ये ना !
आता कुठवर धिर
मी धरू ?
काळिज करतंय
बघ हुरहुरू
सजणे नको ग
मागे फिरू
माझ्या सुरांत
सुर ये भरू
माझे डोळे शिणले
ग, तुझी वाट
पाहुनी, ग ये
बसंती वाऱ्यात,
तोऱ्यात ये
ना
सखे ग साजणी
! ये ना !
सुखाची उधळीत
बरसात ये ना
सखे ग साजणी
! ये ना !
|