दिवसभर पावसात
असून, सांग
ना आई
झाडाला खोकला
कसा होत नाही
?
दिवसभर पावसात
खेळून, सांग
ना आई
वारा कसा जराही
दमत नाही ?
रात्रभर पाढे
म्हणून, सांग
ना आई
बेडकाचा आवाज
कसा बसत नाही
?
रात्रभर जागून
सुद्धा, सांग
ना आई
चांदोबा झोपी
कसा जात नाही
?
दिवसभर काम
करून, सांग
ना आई
तुला मुळी थकवा
कसा येत नाही
?
|