ठाऊक नाही मज
काही !
ठाऊक आहे का
तुज काही,
कशी होती रे
माझी आई ?
मऊ जशी ती साय
दुधाची,
होती आई का
तशी मायेची
?
बागेतील ते
कमल मनोहर,
आई होती का
तशीच सुंदर
?
देवाघरी का
एकटी जाई ?
ठाऊक आहे का
तुज काही,
कशी होती रे
माझी आई ?
चिउकाऊची कथा
चिमुकली,
सांगत होती
का ती सगळी
?
अम्हांसारखे
शुभंकरोती,
म्हणे रोज का
देवापुढती ?
गात असे का
ती अंगाई ?
ठाऊक आहे का
तुज काही,
कशी होती रे
माझी आई ?
मऊ साइहुन आई
प्रेमळ !
गंगेहून ती
आहे निर्मळ
अमृताचे घास
भरविते
आभाळापरी माया
करीते
आईवाचून मीही
विरही
ठाऊक आहे का
तुज काही,
कशी होती रे
माझी आई ?