आवडती भारी
मला माझे आजोबा
पाय त्यांचे
थकलेले
गुडघ्यात वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गाती
गीता माझे आजोबा
नातवंडा बोलावून
घोगऱ्याशा आवाजानं
सांगती ग रामायण
मोबदला पापा
घेती माझे आजोबा
रागेजता बाबा-आई
अजोबांना माया
येई
जवळी ते घेती
बाई
कुटलेला विडा
देती माझे आजोबा
खोडी करी खोडकर
अजोबांची शिक्षा
थोर
उन्हामध्ये
त्यांचे घर
पोरांसंगे पोर
होती माझे आजोबा
|