टप् टप् पडती
अंगावरती प्राजक्ताची
फुले
भिर् भिर्
भिर् भिर्
त्या तालावर
गाणे अमुचे
जुळे !
कुरणावरती,
झाडांखाली
ऊन-सावली विणते
जाळी
येतो वारा पाहा
भरारा, गवत
खुशीने डुले
!
दूर दूर हे
सूर वाहती
उन्हात पिवळ्या
पाहा नाहती
हसते धरती,
फांदीवरती हा
झोपाळा झुले
!
गाणे अमुचे
झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे
लुक-लुक तारा
पाऊस, वारा,
मोरपिसारा या
गाण्यातुन फुले
!
फुलांसारखे
सर्व फुला रे
सुरात मिसळुनि
सूर, चला रे
गाणे गाती तेच
शहाणे बाकी
सारे खुळे !
|