ॐ नमोजी आद्या
। वेद प्रतिपाद्या
॥
जय जय स्वसंवेद्या
। आत्मरूपा
॥१॥
देवा तूंचि
गणेशु ।
सकळमति प्रकाशु
॥
म्हणे निवृत्ति
दासु ।
अवधारिजो जी
॥२॥
अकार चरण युगुल
। उकार
उदर विशाल
॥
मकार महामंडल
। मस्तकाकारें
॥३॥
हे तिन्ही एकवटले
। तेथें
शब्द्ब्रम्ह
कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें
नमिलें ।
आदिबीज ॥४॥
आतां अभिनव
वाग्विलासिनी
। जे चातुर्यार्थ
कलाकामिनी
॥
ते श्रीशारदा
विश्वमोहिनी
। नमिली
मीयां ॥५॥
|