अणुरेणिया थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिले कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटी ॥३॥
तुका म्हणे आता ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
रचना
-
संत तुकाराम
संगीत
-
राम फाटक
स्वर
-
पं. भीमसेन जोशी
राग
-
मालकंस
(नादवेध)