अधिक देखणें
तरी निरंजन
पाहणे ।
योगिराज विनविणें
मना आलें वो
माये ॥१॥
देहबळी देऊनी
साधिलें म्यां
साधनीं ।
तेणे समाधान
मज जोडलें वो
माये ॥२॥
अनंगपण फिटलें
मायाछंदा सांठविलें
।
सकळ देखिलें
आत्मसवरूप वो
माये ॥३॥
चंदन जेवीं
भरला अश्वत्थ
फुलला ।
तैसा म्यां
देखिला निराकार
वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां
प्रपंचा पाहणें
।
निजानंदी राहणे
स्वरूपीं वो
माये ॥५॥
ऐसा ज्ञानसागरू
रखुमादेविवरू
।
विठ्ठलीं निर्धारू
म्यां देखिला
वो माये ॥६॥
|