आरंभी वंदीन
अयोध्येचा राजा
।
भक्ताचीया काजा
पावत असे ॥१॥
पावत असे महासंकटी
निर्वाणी ।
रामनाम वाणी
उच्चारीत ॥२॥
उच्चारिता राम
होय पाप चर
।
पुण्याचा निश्चय
पुण्यभूमी
॥३॥
पुण्यभूमी पुण्यवंतासीं
आठवे ।
पापीयानाठवे
काही केल्या
॥४॥
काही केल्या
तुझे मन पालटेना
।
दास म्हणे जन
सावधान ॥५॥
|