एकतत्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥

तें नाम सोपें रें राम कृष्ण गोविंद ।
वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ॥२॥

नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा,
वायां आणिका पंथा जाशी झणें ॥३॥

ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं,
धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥
 
 
रचना - संत ज्ञानेश्वर
संगीत - केशवराव भोळे
स्वर - यशवंत
चित्रपट - संत ज्ञानेश्वर (१९४०)
For the printable version of this song, click here.