कमोदिनी काय जाणे तो परिमळ ।
भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥

कैसें तुज ठावें नाही तुझें नाम ।
आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥२॥

माते तृण बाळा दुधाचि ते गोडी ।
ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥२॥

तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं ।
नाही त्याची भेटी भोगती ये ॥३॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - लता मंगेशकर
For the printable version of this song, click here.