काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
।
नांदतो केवळ
पांडुरंग ॥१॥
भाव-भक्ति भीमा
उदक ते वाहे
।
बरवा शोभताहे
पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती
हेंचि वाळुवंट
।
मिळालासे थाट
वैष्णवांचा
॥३॥
ज्ञान ध्यान
पूजा विवेक
आनंद ।
हाचि वेणुनाद
शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा
एक मेळ केला
।
ऐसा गोपाळकाला
होत असे ॥५॥
देखिली पंढरी
देहीं-जनी-वनीं
।
एका जनार्दनी
वारी करी ॥६॥
|