जे का रंजले
गांजले ।
त्यासी म्हणे
जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा
।
देव तेथेंचि
जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य
नवनीत ।
तैसे सज्जनांचे
चित्त ॥३॥
ज्यासीं अपंगिता
पाही ।
त्यासई धरी
जो हृदयी ॥४॥
दया करणे जे
पुत्रासी ।
तोचि दासा आणि
दासी ॥५॥
तुका म्हणे
सांगो किती
।
त्याचि भगवंताच्या
मूर्ति ॥६॥
|