तुज सगुण म्हणों
कीं निर्गुण
रे ।
सगुण निर्गुण
एकु गोविंदु
रे ॥१॥
अनुमाने ना
अनुमाने ना
।
श्रुति नेति
नेति म्हणती
गोविंदु रे
॥२॥
तुज स्थूळ म्हणों
कीं सूक्ष्म
रे ।
स्थूळसूक्ष्म
एकु गोविंदु
रे ॥३॥
तुज आकारू म्हणों
कीं निराकारू
रे ।
आकारूनिराकारू
एकु गोविंदु
रे ॥४॥
तुज दृश्य म्हणों
कीं अदृश्य
रे ।
दृश्याअदृश्य
एकु गोविंदु
रे ॥५॥
तुज व्यक्त
म्हणों कीं
अव्यक्तु रे
।
व्यक्त अव्यक्त
एकु गोविंदु
रे ॥६॥
निवृत्ती प्रसादें
ज्ञानदेवो बोले
।
बाप रखुमादेविवरू
विठ्ठलु रे
॥७॥
|