देवाचिये द्वारीं
उभा क्षणभरी
।
तेणें मुक्ति
चारी साधलिया
॥१॥
हरि मुखें म्हणा
हरि मुखें म्हणा
।
पुण्याची गणना
कोण करीं ॥२॥
असोनि संसारीं
जिव्हे वेग
करीं ।
वेद-शास्त्र
उभारी बाह्या
सदा ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे
व्यासाचिये
खुणे ।
द्वारकेचे राणे
पांडवां घरीं
॥४॥
|