आता विश्वात्मकें
देवें ।
येणे वाग्यज्ञें
तोषावें ।
तोषोनिं मज
ज्ञावे ।
पसायदान हें
॥
जें खळांची
व्यंकटी सांडो
। तया सत्कर्मी-
रती वाढो ।
भूतां परस्परे
पडो । मैत्र
जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर
जावो ।
विश्व स्वधर्म
सूर्यें पाहो
।
जो जे वांच्छिल
तो तें लाहो
। प्राणिजात
॥
वर्षत सकळ मंगळी
। ईश्वरनिष्ठांची
मांदियाळी
।
अनवरत भूमंडळी
। भेटतु
भूतां ॥
चलां कल्पतरूंचे
आरव । चेतना
चिंतामणींचें
गाव ।
बोलते जे अर्णव
। पीयूषाचे
॥
चंद्र्मे जे
अलांछ्न ।
मार्तंड
जे तापहीन
।
ते सर्वांही
सदा सज्जन
। सोयरे होतु
॥
किंबहुना सर्व
सुखी ।
पूर्ण होऊनि
तिन्हीं लोकी
।
भजिजो आदिपुरुखी
। अखंडित
॥
आणि ग्रंथोपजीविये
। विशेषीं
लोकीं इयें
।
दृष्टादृष्ट
विजयें ।
होआवे जी
।
येथ म्हणे श्री
विश्वेशराओ
। हा होईल
दान पसावो
।
येणें वरें
ज्ञानदेवो
। सुखिया
जाला ॥
|