पांडुरंगकांती
दिव्य तेज झळकती
।
रत्नकीळ फांकती
प्रभा ।
अगणित लावण्य
तेजःपुंजाळले
।
न वर्णवे तेथींची
शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु
कर्नाटकु ।
तेणें मज लावियला
वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि
खुणाची पालवी
।
आळविल्या नेदी
सादु ॥२॥
शब्देंविण संवादु
दुजेंवीण अनुवादु
।
हें तंव कैसेंनि
गमे ।
परेहि परतें
बोलणें खुंटलें
।
वैखरी कैसेंनि
सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें
तंव पाउलचि
न दिसे ।
उभाचि स्वयंभु
असे ।
समोर कीं पाठिमोरा
न कळे ।
ठकचि पडिलें
कैसें ॥४॥
क्षेमालागी
जीव उतावीळ
माझा ।
म्हणवूनि स्फुरताती
बाहो ।
क्षेम देऊं
गेलें तंव मीचि
मी एकली ।
आसावला जीव
राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु
हृदयींचा जाणुनी
।
अनुभवु सौरसु
केला ।
दृष्टीचां डोळां
पाहों गेलें
तंव ।
भीतरीं पालटु
झाला ॥६॥
|