भेटीलागीं जीवा
लागलीसे आस
।
पाहे रात्रंदिवस
वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा
चंद्रमा चकोरा
जीवन ।
तैसे माझे मन
वाट पाहें
॥२॥
दिवाळीच्या
मुळा लेकी आसावली
।
पाहतसे वाटुली
पंढरीची ॥३॥
भुकेलिया बाळ
अति शोक करी
।
वाट पाहे परि
माऊलीची ॥४॥
तुका म्हणे
मज लागलीसे
भुक ।
धांवूनि श्रीमुख
दावीं देवा
॥५॥
|