रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥

 
 
रचना - संत ज्ञानेश्वर
संगीत - सी. रामचंद्र
स्वर - आशा भोसले
चित्रपट - श्री संत निवृत्ति-ज्ञानदेव (१९६०)
For the printable version of this song, click here.