विठ्ठल गीतीं
गावा, विठ्ठल
चित्तीं घ्यावा
।
विठ्ठल उभा
पहावा विटेवरी
॥१॥
अनाथांचा बंधु
विठ्ठल कृपासिंधु
।
तोडी भवबंधु
यमपाश ॥२॥
तोचि शरणांगत
विठ्ठल मुक्तिदाता
।
विठ्ठल या संतां
समागमें ॥३॥
विठ्ठल गुणनिधी
विठ्ठल सर्वसिद्धी
।
लागली समाधि
विठ्ठल नामें
॥४॥
विठ्ठलाचें
नाम घेतां झालें
सुख ।
गोडावलें मुख
तुका म्हणे
॥५॥
|