सावळे सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयी माझे ॥१॥

आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड ।
तुझे नाम गोड पांडुरंगा ॥२॥

जन्मोजन्मी ऐसे मागितले तुज ।
आम्हासी सहज द्यावे आता ॥३॥

तुका म्हणे तुज ऐसे दयाळ ।
धुंडिता सकळ नाही आम्हा ॥४॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - पं. भीमसेन जोशी
राग - मालकंस (नादवेध)
For the printable version of this song, click here.