ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥१॥

मज पामरासी काय थोरपण ।
पायीची वहाण पायी बरी ॥२॥

ब्रम्हादिक जेथे तुम्हा वोळगणे ।
इतरां तुळणे काय पुढे ॥३॥

तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली ।
म्हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥
 
 
रचना - संत तुकाराम
संगीत - राम फाटक
स्वर - पं. भीमसेन जोशी
For the printable version of this song, click here.