विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम आंगासी आला ॥१॥

पंचप्राण व्याकूळ झाला ।
त्यानें माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥२॥

मनुष्य इंगळी अति दारूण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ॥३॥

ह्या विंचवाला उतारा ।
तमोगुण मागें सारा ।
सत्वगुण लावा अंगारा ।
विंचु इंगळी उतरे झरझरा ॥४॥

सत्य उताऱ्या येऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनीं ॥५॥
 
 
रचना - संत एकनाथ
 
 
संतांनी भारुडांच्या माध्यमातून लोकरंजनातून लोकशिक्षण केले. वरील भारुड हे मूळ स्वरूपातील आहे.
भारूड गाताना त्यात लोकरंजनाचा विचार केला जातो.

प्रचलीत स्वरुपातील ’विंचू चावला’

For the printable version of this song, click here.