कशि या त्यजू पदाला ।
मम सुभगशुपदाला ॥
वसे पदयुग जिथे हे ।
मम स्वर्ग तेथ राहे ।
स्वर्लोकि चरण हे नसती ।
तरि मजसि निरयवसती ती ॥
नरकही घोर सहकांता ।
हो स्वर्ग मला आता ॥
गीत
-
विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत
-
गंधर्व नाटक मंडळी
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत एकच प्याला (१९१९)
राग
-
पहाडी
(गज्जल) (मूळ संहिता)
ताल
-
धुमाळी
चाल
-
दिल बेकरार तूने