प्रभु अजि गमला, मनी तोषला ॥
कोपे बहु माझा । तो प्रभुराजा ।
आता हासला । मनी तोषला ॥
मृतचि हृदय होते नाथ, हे पूर्ण झाले ।
परि वचनसुधेने त्यासि जिवंत केले ॥
अमृतमधुर शब्द त्या पुन्हा ऐकण्याते ।
श्रवणि सकल माझी शक्ति एकत्र होते ॥
गीत
-
विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत
-
गंधर्व नाटक मंडळी
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत एकच प्याला (१९१९)
राग
-
भैरवी (मूळ
संहिता)
ताल
-
केरवा
चाल
-
गा मोरी ननदी