हे दीपा तू जळत रहा ।
असाच जागत या विजनावर
जीवनसुम तिमिरास वहा ॥
नक्षत्रांशी होते नाते
परी न आता सांगायाचे
भग्न चिऱ्यावर वादळात या
तुला मला रे जळावयाचे
विसर मंदिरे विसर गोपुरे
श्रेय इथे मातीत पहा ॥
गीत
-
वि. वा. शिरवाडकर
संगीत
-
पं. जितेंन्द्र अभिषेकी
स्वर
-
कान्होपात्रा
नाटक
-
ययाति आणि देवयानी (१९६६)