फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने
सजले रे क्षण माझे सजले रे

झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्षाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
खुलले रे क्षण माझे खुलले रे

ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मन मोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
हसले रे क्षण माझे हसले रे

रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने
भुलले रे क्षण माझे भुलले रे
 
 
गीत - नितीन आखवे
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले
राग - पहाडी (नादवेध)
For the printable version of this song, click here.
   
  Asha Bhosale
  Asha Bhosale