बलसागर तुम्हि
वीरशिरोमणि
कोठें तरि रमलां
।
आश्वासन जिस
दिलें तिला
कां विसरुनियां
गेलां ॥
पेरियलें जें
प्रीतितरूचें
बीज हृदयिं
त्याला ।
अंकुर येउनि
सुदृढ त्याचा
वृक्ष असे झाला
।
सुंदर तुम्ही
मूर्तिमान तच्छायेला
बसलां
चित्र असे हृदयांत
कोंदतां ठाव
न अन्याला
॥
पांडुकुमारा
पार्थ नरवरा,
राखा वचनाला
।
निश्चय माझा
नढळे जरि हा
कंठ कुणीं चिरला
॥
|