कोण तुजसम सांग गुरुराया । कैवारी सदया ।
पाहिजे तें अंगी स्वीकाराया । भवदुःख हराया ॥

तूंचि विष्णु, तूंचि शिव, तूं धाता । तूं विश्वंभरता ।
तूंचि व्यापकव्याप्यातें प्रसवीता । तूं मायेपरता ॥

तूंचि शिष्या पोसणारी माता । तूं विद्यादाता ।
तूंचि देशी तत्वनिधी निजहाता । तारक बलवंता ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - छोटा गंधर्व
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
राग - मिश्र पिलू (मूळ संहिता)
ताल -
चाल - धन्य दिवस आज वर्णू
For the printable version of this song, click here.