वद जाउं कुणाला
शरण करी जो
हरण संकटाचें
।
मी धरिन चरण
त्याचे ।
अग सखये
॥
बहु आप्त बंधु
बांधवां प्रर्थिलें
कथुनि दुःख
मनिंचें ।
तें होय विफल
साचें ।
अग सखये ॥
मम तात जननि
मात्र तीं बघुनि
कष्टती हाल
ईचे ।
न चलेचि कांहिं
त्यांचें ।
अग सखये
॥
जे कर जोडुनि
मजपुढें नाचले
थवे यादवांचे
प्रतिकूल होति
साचे ।
अग सखये ॥
|