लाल शालजोडी
जरतारी झोकदार
शिरिं बांधोनी
।
नाचत चाले जैसा
येतों रंगभूमिवर
नट सजुनी ।
वाजे कडकड छाटि
गुलाबी माळ
जपाची करिं
धरुनी ।
ध्यान धरुनि
बैसतां दिसे
मज दंभिकपण
वर ये फुटुनी
।
सर्वांगावर
भस्माचे ते
पुंड्र लावि
किति रेखोनी
।
त्यावरि रुद्राक्षांच्या
माळा घालितसे
तरि किती जपुनी
।
स्फटिकांची
ती सुबक कुंडले
डुलतांना हलती
कानीं ।
पायिं खडावा
चटचट करिती
दंड शोभती करिं
तीन्ही ॥
|