कळी उमलते मना एकदा
पुन्हा न सुख ते मिळे दहादा

लहर वायुची शीत चंद्रकोर
ती लज्जांकित अबोल थरथर
दळदळ उधळी मुक्त सुगंधा

एक रात ती सौभाग्याची
आस पुरविते शतजन्माची
मौन साधिते सुख-संवादा

असले जीवन अशी पर्वणी
निर्माल्याच्या कुठुन जीवनी
अवघे जीवन हीच आपदा
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - पाहू रे किती वाट (१९६३)
For the printable version of this song, click here.