अवचिता परिमळू,
झुळुकला अळुमाळू
।
मी म्हणु गोपाळू,
आला गे माये
॥१॥
चांचरती चांचरती
बाहेरी निघाले
।
ठकचि मी ठेलें
काय करू ॥२॥
तो सावळा सुंदरू
कासे पितांबरू
।
लावण्य मनोहरू
देखियेला ॥३॥
बोधुनी ठेलें
मन तव जालें
आन ।
सोकोनी घेतले
प्राण माझे
गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू
विठ्ठल सुखाचा
।
तेणें काया
मने वाचा वेधियेलें
॥५॥
|