हृदयिं धरा हा बोध खरा ।
संसारीं शांतिचा झरा ॥
संशय खट झोटिंग महा ।
देउं नका त्या ठाव जरा ॥
निशाचरी कल्पना खुळी ।
कवटाळिल ही भीति धरा ॥
बहुरूपा ती जनवाणी ।
खरी मानितां घात पुरा ॥
गीत
-
गोविंद बल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्लाळ देवल
स्वर
-
बालगंधर्व
नाटक
-
संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग
-
पिलू
(मूळ संहिता)
ताल
-
चाल
-
जल जयो ऐसी