संशय का मनिं आला । कळेना ।
कारण काय तयाला ॥

आळ वृथा कीं चित्र दिलें मी
कोणा परपुरुषाला ॥

कोपुनि गेले ही मज लागे
हळहळ घोर मनाला ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग - खमाज (मूळ संहिता)
ताल -
चाल - शाम घुंगट पट खोलो
For the printable version of this song, click here.