हा खचित दिसे मम भाग्यकाल ।
मोहुनि त्यांच्या कपटभाषणा ।
नाहि सोडिलें सदन काल ॥

श्रीयुत हे संभाविति दाविति ।
परिं आचरणीं उलट चाल ॥

भल्या, हीन मग गणिका आम्ही ।
उघड घालितो मोहजाल ॥
 
 
गीत - गोविंद बल्लाळ देवल
संगीत - गोविंद बल्लाळ देवल
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत संशयकल्लोळ (१९१६)
राग - पूर्वी (संगीत-सरिता)
चाल - ’वाट चलत छेडत’
For the printable version of this song, click here.