पैल तो गे काऊ
कोकताहे ।
शकुन गे माये
सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ
तुझे सोन्यानें
मढवीन पाऊ
।
पाहुणे पंढरीरावो
घरा कैं येती
॥२॥
दहिंभाताची
उंडी लावीन
तुझे तोंडी
।
जीवा पढिये
त्याची गोडी
सांग वेगी
॥३॥
दुधें भरूनी
वाटी लावीन
तुझें वोंठी
।
सत्य सांगे
गोठी विठो येईल
कायी ॥४॥
आंबया डाहाळी
फळें चुंबी
रसाळीं ।
आजिचे रे काळीं
शकुन सांगे
॥५॥
ज्ञानदेव म्हणे
जाणिजे ये खुणें
।
भेटती पंढरीराये
शकुन सांगे
॥६॥
|