कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई ।
स्त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही ॥

रंगुनि रंगात मधुर मधुर बोलती ।
हसत हसत फसवुनी हृद्बंध जोडिती ।
हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती ।
पदर पदर परि शेवटि तुटत तुटत जाई ॥
 
 
गीत - तात्यासाहोब कोल्हटकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी
स्वर - दीनानाथ मंगेशकर
नाटक - भावबंधन (१९१९)
राग - यमनकल्याण (मूळ संहिता)
ताल - दादरा
For the printable version of this song, click here.