आवडती वस्तू लोभानें ।
पसरिला घ्यावयालागि हात किं यानें ॥

सकल करांगुलिंवर रेखा या दिसति ।
किं सविमल जालमिषानें ॥

कमल सकाळीं किंचित फुलतां
अविरलनवदलपरि मी मानें ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
नाटक - संगीत शाकुंतल (१८८०)
राग - परज (मूळ संहिता)
ताल - त्रिताल
For the printable version of this song, click here.