सखये अनसूये थांब कि बाई ।
येतें मी, अशि कां घाई ॥
रुतला दर्भांकुर माझ्या पाईं ।
मजला तो दुःखद होई ॥
साडी कोराटीस गुंतून जाई ।
सोडवितें तोंवरिं राही ॥
गीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत
-
अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर
-
नाटक
-
संगीत शाकुंतल (१८८०)
राग
-
पिलू
(मूळ संहिता)
ताल
-
धुमाळी