मज गमे ऐसा जनक तो । मांग साचा ॥
मुख सुरकुतलें, मस्तक पिकलें ।
शरीर रोगांनीं पोखरिलें ।
स्मशान ज्याने सन्निध केलें ।
त्या प्रेताला दुहिता विकतो ॥
क्रूराधम हा जनक कशाचा ।
अप्रत्यभक्षी व्याघ्र मुखाचा ।
वास नसावा जगीं अशाचा ।
नवल हेंच यम यास विसरतो ॥
गीत
-
गोविंद बल्लाळ देवल
संगीत
-
गोविंद बल्लाळ देवल
स्वर
-
पं. वसंतराव देशपांडे
नाटक
-
संगीत शारदा (१८९९)
चाल
-
’करि दळो बारो कामिनि’