किती सांगुं
तुला मज चैन
नसे ॥
हें दु:ख तरी
मी साहुं कसें
।
या समयिं मला
नच कोणी पुसे
।
हा विरह सखे
मज भाजितसे
।
मन कसें आवरूं
।
किती धीर धरूं
। कसे करूं
॥
हे बंधु नव्हत
मम वैरी खरे
।
दावीती कसें
वरि प्रेम बरें
।
बोलोनी पाडीती
हृदयासी घरे
।
नको नको मला
जिव ।
विष तरि पाजिव
।
सखे सोडिव
॥
|