अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥

जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥

सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥

बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥
 
 
रचना - संत ज्ञानेश्वर
संगीत - मा. कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर - मधुवंती दंडेकर
नाटक - संत कान्होपात्रा (१९३१)
राग - धानी (मूळ संहिता)
ताल - धुमाळी, भजनी
For the printable version of this song, click here.