भोगले जे दुःख
त्याला सुख
म्हणावे लागले
!
एवढे मी भोगिले
की मज हसावे
लागले !
ठेविले आजन्म
डोळे आपुले
मी कोरडे
पण दुज्यांच्या
आसवांनी मज
भिजावे लागले
!
लोक भेटायास
आले काढत्या
पायांसवे
अन् अखेरी
कुशल माझे मज
पुसावे लागले
!
गवसला नाहीच
मजला चेहरा
माझा कधी
मी कशी होते
मलाही आठवावे
लागले !
एकदा केव्हातरी
मी वचन कवितेला
दिले;
राखरांगोळीस
माझ्या गुणगुणावे
लागले !
|