तिनं साडी आणा म्हंटली .... आणली !
तिनं चोळी आणा म्हंटली .... आणली !
तिनं नथ आणा म्हंटली .... आणली !
तिनं बुगडी आणा म्हंटली .... आणली !

दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली,
माडीवरची मंडळी खाली आली,
आली आली हो भागाबाई,
आली आली हो भागाबाई !

भागाबाई बोलली हटून,
अन्‌ लग्नाला बसली नटून,
पण तिथं नव-याचा पत्त्याच नाही,
आली आली हो भागाबाई !

भागाबाई निघाली जत्रंला,
शंभर रुपयं बांधलं पदराला,
पर मांजर आडवंच जाई,
आली आली हो भागाबाई !

भागाबाई पडली इरेला,
ह्यो बापई नवरा ठरिवला,
त्याच्या तोंडाला नाकच नाही,
आली आली हो भागाबाई !

अशी आमची भागाबाई शहाणी
तिच्या जल्माची झाली कहाणी
कड पत्तूर एकलीच ऱ्हाई
आली आली हो भागाबाई !
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - राम कदम
चित्रपट - बाई मी भोळी (१९६७)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.