आज गुज सांगते तुला छंद एक लागला मला
पहाटची उठुन मी, उगिच चुंबिते फुला फुला

धुक्यात धुंद हिंडते, स्वप्नलोक धुंडते
हळुच फुंक घालुनी, फुलविते दला-दला

फुलापरीस कोमले, चुंबितेस तू फुले
सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला

त्या फुलात कल्पना दावि दोन लोचना
याही लोचनास सखी, तोच ध्यास लागला
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत देसाई
स्वर - लता मंगेशकर, महेंद्र कपूर
चित्रपट - बाप माझा ब्रम्ह्चारी (१९६२)
For the printable version of this song, click here.